isha keskar and Rishi Saxena Video | ऋषी ईशाचं झालं भांडण,व्हिडिओ आला समोर | Lokmat Filmy

2021-08-24 0

तरुणांमध्ये लोकप्रिय असेलेली अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना ही जोडी सोशल मिडियावर सध्या कमालीची हिट ठरतेय. दोघांचीही रोमॅन्टिक केमिस्ट्री चाहत्यांच्या कमालीची पसंतीस पडत असते. दोघेही सोशल मिडियावर बरेच सक्रिय असून अनेक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. ऋषीने नुकताच ईशासोबत एक व्हिडिओ इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. ‘कहाणी हर घर की म्हणत’ असं कॅप्शन देत ऋषीने हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ईशा ऋषीला तिचं ऐकायला सांगते आणि ऋषी तिला मजेशीर पद्धतीने नाही म्हणतो. यावर ईशा रागवते सुद्धा पण ऋषी ईशाचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असतो पण हे सगळ अगदी मजेशीर पद्धतीने सुरू असताना दिसून येतं. सध्या त्यांचा हा रिल चाहत्यांना चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यांच्या या रिलवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसतोय.
Chitralivo
#ishakeskar #RishiSaxena #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires